Posts

चौल्हेर किल्ला..

Image
किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच गड आहे. चौरगड चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे. इतिहास : येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते..गडावर मोती टाके, शेवाळ्या टाके, हत्यार्‍या टाके, खेकड्या टाके आहे या गावाला आधी मोठा कोट होता येथे गवळी राजा राज्य करीत असे त्याच काळातील एक घोडपागा वाडीचौल्हेर मध्ये आजही पहावयास मिळते या राजाच्या हाताखाली काही हजारी (उदा पंचहजारी इ) काही मन्सबदार होते यातील एक मन्सबदार पुढे देखील या परिसराची देखभाल करत असे गडावरील  पहाण्याची ठिकाणे : गडावर शिरतांनाच एक भुयारी दरवाजांची रांगची रांग लागते. गडावर शिरण्यासाठी ३ दरवाज्यातून आत जावे लागते. हे दरवाजे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुनाच होय. गडावर शिरल्यावर समोरच बालेकिल्ला आहे. तर डावीकडे गडाची छोटीशी माची आहे. गडाच्या माचीवर पाण्याचे एक मोठे तळे आहे. तर शेवटच्या टोकाला तटबंदीचे काही अवशेष आहेत. माचीवर फ

Indrai fort..

यादव कालीन किल्ला १२२६ पासून चा आजही आपल्याला इतिहास सांगतोय.. https://youtu.be/77NOQv4Owwg

पंच रथी मंदिर ( हेमाडपंथी मंदिर ) ,देवळी वणी..

Image
देवळी कराड असो वा देवळी हे गाव. ही गावे खरेतर लहान-लहान आदिवासी पाडी आहेत. ती नंतरच्या काळात वसली; मात्र त्यापूर्वी हा परिसर मोठा इतिहास घेऊन जगत असणार यात शंका नाही. याच इतिहासाच्या या पाऊलखुणा जपण्याची गरज आहे. तरच नाशिकच्या इतिहासाची कवाडे कायम खुली राहतील, अन्यथा आपण एकएक करून सर्वकाही हरवून बसू. याचं भान नावातच देव अन् त्याचं घर असलेली देवळी ही दोन्ही गावे देतात.    मंदिरं कशी निर्माण झाली असतील. याचा एक नमुना देवळी कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले देवळी नावाच्या गावात पहायला मिळतो. या गावाला देवळी वणी असेही म्हणतात. हे गाव तेव्हा वणी संस्थानच्या अंतर्गत असल्याने गावाला देवळी वणी म्हटले गेले असावे. या गावात मंदिराच्या गर्भगृहाचीच बांधणी झालेला दगडांचा ढाचा आहे. हा ढाचा पाहिला की, येथेही देवळीकराडसारखं मंदिर उभे राहण्याच्या तयारीत होते; मात्र ते अचानक बंद पडलं असावे असे वाटते. या ढाच्यामुळे मंदिराची निर्मिती होत असताना पहिल्यांदा गर्भगृह कसा आकार घेत असेल हे पहायला मिळतं. देवळी गावातील हनुमान मंदिराच्या शेजारी पाच फूट उंचीच्य

शिवाजी महाराजांचे किल्ल्यांची यादी..

किल्ले..           शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे १११ किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. या यादीचा उद्देश शिवाजी महाराजांचे माहिती व त्यांंचे काम दाखविण्याचा आहे. त्यांची मजल कोठपर्यंत होती हे दाखविणे हा ही एक उद्देश आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातुन केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल झाडी,डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तेथे आठ किल्ले होते.हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता.शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता.त्यांनी घाट

धोडप किल्ला...आयुष्यात पहिला ट्रेक..

आयुष्यात पहिल्या वेळेस ट्रेकिंग का जाणार होतो ते म्हणजे ९/१२/२०१९ ल सकाळी आणि ते म्हणजे धोडप किल्ला..थंडी चे दिवस आणि सकाळी साखर झोप मिळून जाणे खूप अवघड होणार होते पण मित्रां मुळे गेलो आणि संपूर्ण दिवस चडण्यात आणि उतर्ण्यात गेला पण त्या नंतर ते मी निते नियम पाळले आणि जवळ पास दर रविवारी एक किल्ला असे चालू झाले.. राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब आहेत.